शहर विभागात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण सापडले आहेत. मागील दोन महिन्यापासून आठ रुग्ण सापडले असल्याने संबंधित विभागात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता यामधील तीन विभाग कंटेनमेंट मुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमननगर, कॅम्प आणि आस्मा कॉलनी या तीन विभागांना कंटेनमेंट झोन म्हणून मुक्त करण्यात देण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ एस बी बोम्मनहळळी यांनी दिला आहे. तर शहरातील आझाद गल्ली आणि सदाशिवनगर परिसरात 100 मीटर परीघ कंटेनमेंट झोन लागू करण्यात आले आहे. या भागातील शंभर मीटर अंतरापर्यंत हा नियम लागू आहे.
सध्या बेळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. अशा परिस्थितीत नुकतीच जिल्हाधिकार्यांनी काढलेला आदेश हा बऱ्याच ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्याचा आणि कोरोनाशी लढण्याचा उद्देश आहे. सध्या आझाद गल्ली आणि सदाशिवनगर हे दोनच विभाग मनपा कार्यक्षेत्रात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
मागील दोन महिन्यापासून बेळगावात मनपा कार्यक्षेत्रात आठ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर आझाद गल्ली, कॅम्प, आस्मा कॉलनी हे परिसर कंटेनमेंट घेऊन मुक्त करण्यात आले आहेत. तर आणखी दोन प्रदेश कंटेनमेंट घेऊन म्हणून तसेच ठेवण्यात आले आहे. त्या परिसरातील शंभर मीटर अंतरापर्यंत कोणालाही ये-जा करण्याची मुभा देण्यात आली नाही. कोरोनाची वाढती महामारी अनेकांना त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते आपल्या परीने प्रयत्न करत आहेत.
मात्र ही संख्या अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदाशिवनगर येथील एका 27 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोमाची लागण झाली होती. तिच्या संपर्कात एकूण 45 जण आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सदाशिव नगर परिसरात दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे तर आरोग्य खाते आणि पोलिस प्रशासनाने या परिसरातील अनेक रस्ते बंद केले आहेत.