शनिवार 30 मे रोजीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावची 30 वर्षीय महाराष्ट्र रिटर्न महिला कोरोना पोजिटिव्ह आढळली आहे. बेळगावात रुग्ण संख्या 147 तर राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1922 झाली आहे.
गेल्या आठवडा भरा पासून दररोज राज्यातील रुग्ण संख्या 100 हुन अधिक आकड्यांनी वाढत आहे शनिवारी देखील 141 नवे रुग्ण राज्यात सापडले आहेत. 141 पैकी जवळपास 88 पोजिटिव्ह रुग्ण महाराष्ट्र रिटर्न आहेत.
सदर पोजिटिव्ह महिला बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या तुरमुरी गावची असल्याची माहिती मिळत आहे.ती मुंबई रिटर्न असून तुरमुरी येथे आपल्या माहेरी आली होती.मुंबई रिटर्न असतेवेळी 14 दिवस क्वारंटाइन राहून आपल्या घरी गेली होती तिथं गेल्यावर होम क्वारंटाइन होती तिथं ताप आल्याने तिची चाचणी करण्यात आली होती ती पोजिटिव्ह आढळली आहे.
सदर 30 वर्षीय महिलेच्या माहेरच्या घरातील सदस्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे.या महिले पोजिटिव्ह मुळे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील तुरमुरी गावात पहिला पोजिटिव्ह रुग्ण आढळला आहे