जगभरात थैमान घातलेल्या कोविड 19 चा समावेश कर्नाटक सरकार शालेय अभ्यासक्रमात करणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून असे करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरेल.
कर्नाटकाचे शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी याची सुचना दिली. पहिली ते दहावी आणि अकरा बारावी साठी नवा अभ्यासक्रम ठरवण्यात आला. याबद्दल घेतलेली शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून त्यांनी ही सूचना केली.
सहावी ते दहावीच्या पुस्तकात कोविड बद्दल एक धडा समाविष्ट केला जाईल.यात कर्नाटक व केंद्र सरकारने राबवलेल्या कोविड विरोधी आंदोलनाची माहिती दिली जाईल. जगभरात काय झाले याची सुद्धा माहिती देण्यात येईल असे सुरेशकुमार यांनी जाहीर केले.
पुस्तकाबरोबरच यु ट्यूब चा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल असेही सुरेशकुमार यांनी जाहीर केले.
घालणार अभ्यासक्रमात