संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना दुसरीकडे या भीतीमुळे अनेकांचा बळी जीव लागला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना आता विभागवार क्रम देण्यात आले आहेत. रेड ऑरेंज आणि ग्रीन असे तीन विभाग देण्यात आले असून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सूचीनुसार कर्नाटक राज्यातील तीन जिल्हे रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अजून किती जिल्हे रेंड झोनमध्ये जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्नाटक राज्यातील बेंगलोर ग्रामीण बेंगलोर शहर आणि मैसूर जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या परिस्थितीत अनेक जिल्ह्यांमधून कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र विशेष करून बेंगलोर शहर आणि इतर जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात रुग्ण आढळल्याने त्यांना रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यात 69 रुग्ण आढळले आहेत तर बेंगलोर रुरल मध्ये 12 तरी देखील बेंगलोरला रेड झोनमध्ये टाकण्यात आल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटक राज्य सरकारने मागील दोन दिवसांपासून बेळगावला रेड झोनमध्ये असल्याचा शेरा ओढला आहे. मात्र केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या एका पत्रकात बेळगाव शहराचा समावेश ऑरेंज मध्ये केला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत असली तरी आणखी काही दिवसात जर रुग्णांची संख्या वाढली तर बेळगावला ही रेड झोन’मध्ये टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने काढलेल्या सूचीनुसार कर्नाटक राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड झोनचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मात्र कर्नाटक राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांना रेडसून केले आहे. अशा परिस्थितीत सध्या केंद्र सरकारने ओढलेला रेषा अंतिम असून या जिल्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण राज्यात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यापुढे सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.