कोरोना प्रादुर्भावमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र सातत्याने आपल्या कार्याचा ठसा उमटवत श्रीराम सेना हिंदुस्तानी जखमी गायीला जीवदान दिले आहे. तर शेकडो कुटुंबीयांना आधार देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एपीएमसी आवारात एक गाय जखमी अवस्थेत आढळली. तिच्या शेपटीला दुखापत झाली होती. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी त्या गायीच्या शेपटीवरील जखम पाहून तिच्यावर उपचार केले व तिला गोशाळेत पाठवून दिले आहे. त्यांच्या या कार्यकर्त्यांमुळे अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव शहरातील अनेक भागात योग्य गरजूंना शोधून किट देण्यात येत आहे जवळपास एक महिना एका कुटुंबाला पुरेल इतकं साहित्य दिलं जात असून स्व खर्चातून हा उपक्रम राबवला जात आहे
यावेळी रमाकांत कोंडुसकर, नवीन हंचिनमणी, चेतन अपुगोल, सुदेश, संतोष धुडूम आधीनी गाईला मदत केली. यावेळी गायीला गोशाळेत पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही गाय अत्यवस्थ झाली होती. तिच्यावर उपचार करून तिला व्यवस्थित ठेवण्यासाठी गोशाळे रवानगी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या सामाजिक कार्याबरोबरच अनेक कुटुंबीयांचे पोट भरण्याचे काम श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. नुकतीच 300 कुटुंबीयांना मदत करून त्यांनी समाजकार्याचा वसा जपला आहे. अनगोळ येथे अनेक गरीब व गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कुणालाही गरजूंना जर रेशन किटची गरज भासल्यास थेट संपर्क करा असे आवाहन श्रीरामसेनेच्या वतीनं रमाकांत कोंडुस्कर यांनी केलं आहे.