उमेश कत्ती यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे.भाजप पक्ष त्या बाबत निर्णय घेईल.भाजपमध्ये तीन गट आहेत.एक संघाचा,दुसरा जनता दलातून आलेला आणि तिसरा काँग्रेसमधून आलेला असे तीन गट आहेत.भाजप आमदारांना आमच्याकडे वळवण्यासाठी आमच्याकडे बँक बॅलन्स नाही असा बॉम्बही आमदार सतीश जारकीहोळी यांनी टाकला.
गोंधळ घालणे हा रमेश जारकीहोळी यांचा स्वभाव आहे.काँग्रेस पक्षातील कोणीही आमदार पक्ष सोडून जाणार नाही.भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे मध्यावधी निवडणूक होते काय अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.निवडणूक जाहीर झाली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत .भाजपमध्ये बाहेरून गेलेल्या व्यक्तींना पदे दिल्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.
आपल्या गेस्ट हाऊसमध्ये एक हजारहून अधिक लोकांना क्वारंटाईन करून ठेवले होते.पण त्यापैकी सहाशे जणांचा रिपोर्ट येण्या अगोदरच त्यांना सोडून सरकारने मोठी चूक केली आहे.यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो असेही जारकीहोळी म्हणाले.