मुंबईतील धारावीहून आलेल्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोग्य खाते आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
५ मे रोजी बेळगावात बेकायदा दाखल झाल्यावर ही महिला तपासणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये गेली होती.पण ती मुंबईहून आल्याचे कळताच तिला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी करून घेतल्यावर घरी निघून गेली.या महिलेची मुंबईहून आल्याची माहिती आरोग्य खात्याला कळताच त्यांनी त्या महिलेला तपासणीसाठी बोलावून घेतले.नंतर तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला.१४ मे रोजी तिचा रिपोर्ट कोरोना पोजीटिव्ह आला.
या महिलेने सदाशिवनगरमध्ये फिरताना अनेकांशी संवाद साधला आहे.तिला अनेक जण भेटले आहेत.त्यामुळे तिच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या ११ आणि दुय्यम संपर्कात आलेल्या ३५ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या महिलेची ट्रॅव्हल हिस्टरी जाणून घेऊन संपर्कात आलेल्याची माहिती गोळा करण्यात मनपा कर्मचारी गुंतले आहेत.