ग्रामीण भागात क्वारंटाइन असलेल्या लोकांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे.कोरोना विषाणूमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे अनेकांना शाळा समुदाय भवन व इतर जागी व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र अनेक जण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनहळळी यांनी सांगितले आहे.
याबाबत त्यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावून एक बैठक घेतली आहे. या बैठकीत वरील सुचना करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही बसवून अनेकांवर नजर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याची देखभालीचे सर्व ती जबाबदारी ग्रामपंचायतीवर असणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने या कामाला सुरुवात करावी व अनेकांवर सीसीटीव्ही नजर ठेवणे गरजेचे असल्याचे मतही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
ज्या बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वॉरनटाएनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक जेवण खाण व इतर साहित्य घेऊन येत असतात. मात्र कोणत्याही नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देऊ नये. त्यामुळे कोरोना सारखा विषाणू पसणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहन या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
सीसीटीव्ही बसविल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात सोपे होणार आहे. या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत व याबाबतची सर्व ती कार्यतत्परता दाखवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र, तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.