कर्नाटक सरकारने जलसंपदा खात्यातील बारा इंजिनियरना 2 मार्च ते 20 मार्च दरम्यान न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते.लॉक डाऊनमुळे हे बारा जण तेथेच अडकून पडले आहेत.
7 जून रोजी ऑकलंड येथून एक विमान प्रवाशांना घेऊन भारतात येणार आहे.या विमानातून बारा इंजिनियरना भारतात आणण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी अशी मागणी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी परराष्ट्र खात्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बारा इंजिनियर पैकी पाच महिला आणि सात पुरुष आहेत.या इंजिनियर कुटुंबाचे सदस्य कर्नाटक सरकारकडे सतत फोन,इ मेल द्वारे संपर्क साधून त्यांना भारतात लवकर आणा अशी मागणी करत आहेत.आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अवघड झाले आहे.
या महिला इंजिनियरना दोन ते सात वर्षाची मुले आहेत,ही मुले त्यांची आठवण काढत आहेत.तसेच परदेशात राहून त्यांनाही होमसिकनेस आला आहे.त्यांना तेथे भारतीय पद्धतीचे साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे खाण्यापिण्याच्या देखील त्यांच्या गैरसोयी होत आहेत.या साऱ्या बाबी ध्यानात घेऊन बारा इंजिनियरना भारतीय लगेच आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी पत्राद्वारे पराराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.