राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाची अर्थात पीयूसी सेकंड ईयरची परीक्षा आता येत्या गुरुवार दि. 18 जून 2020 पासून आयोजित केली जाणार आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकांनी शुक्रवारी ही घोषणा केली आहे.
राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा यापूर्वी गेल्या 23 मार्चपासून आयोजित करण्यात येणार होती. तथापि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
आता सदर परीक्षा येत्या 18 जूनपासून सकाळी 10.15 ते दुपारी 1.30 या कालावधीत आयोजित केली जाणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकांनी कळविले आहे.