पिरनवाडी (ता. बेळगाव) येथे 258 क्रमांकाचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून गेल्या 28 दिवसात सदर गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे या कालावधीत 258 क्रमांकाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे तसेच त्याच्या संपर्कात आलेले प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट निगेटिव्ह आढळल्यामुळे पिरनवाडीतील “कंटेनमेंट झोन” आता रद्द करण्यात आला आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी आणि जिल्हा सर्व्हिलन्स अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून पिरनवाडी गावातील कंटेनमेंट झोन बुधवार दि. 13 मे 2020 रोजी शून्य तासापासून मागे घेण्यात आला आहे.
पिरनवाडी येथे गेल्या 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री 258 क्रमांकाचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पिरनवाडीला कंटेनमेंट झोन अर्थात निर्बंधित क्षेत्र करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 28 दिवसात सदर गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे या कालावधीत 258 क्रमांकाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे तसेच त्याच्या संपर्कात आलेले प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट निगेटिव्ह आढळल्यामुळे पिरनवाडीतील “कंटेनमेंट झोन” आता रद्द करण्यात आला आहे.
पिरनवाडीचा कंटेनमेंट झोन (निर्बंधित क्षेत्र) पूर्वेला मुजावर गल्ली, पश्चिमेला महावीर गल्ली, उत्तरेकडे नाला आणि मच्छे गांव आणि दक्षिणेला पाटील गल्लीपर्यंत पसरलेला होता. या ठिकाणी 3718 घरे असून येथील लोकसंख्या सुमारे 19 हजार 827 इतकी आहे या क्षेत्राबाहेर 7 कि. मी. अंतराचा बफर झोन ठेवण्यात आला होता.