हा अवघड ठिकाणी होणारा वेदनामय आजार बर्याच लोकांना होतो. मलाशयाच्या आत किंवा बाहेरच्या बाजूच्या रक्तवाहिन्यांत खराब रक्त जमा होऊन त्या रक्तवाहिन्या फुगतात व त्याठिकाणी दाह होतो. बाहेरच्या बाजूने होणार्या मूळव्याधीमुळे रुग्णाला खूप वेदना होतात. त्यातून फारसे रक्त येत नाही. परंतु अंतर्गत मूळव्याधीतून गडद रंगाचे रक्त पडते. काही वेळा रक्तवाहिन्या फुटतात. या मुळव्याधीला रक्त मूळव्याध असे म्हणतात.
मूळव्याधीची कारणे आणि लक्षणे : जुनाट बद्धकोष्ठता आणि आंतड्यातील बिघाड यामुळे मुख्यत: मूळव्याध होते. शौच्याच्यावेळी जोर दिल्याने मलाशयाच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो आणि मूळव्याध उद्भवतो.
यकृत आणि आंतड्याच्या काही विशिष्ठ रोगामध्ये तसेच गर्भारपणी पोटातील अंतर्गत लाब वाढल्यास हमखास मूळव्याध होते. खूप वेळ उभे राहणे किंवा सतत बसणे, लठ्ठपणा, अशक्तपणा, मानसिक ताणतणाव, अतिकष्टाची कामे व अनुवंशिकता ही मूळव्याध होण्याची इतर कारणे आहेत.
उपचार
आहार नियोजन : सर्व पचनसंस्थेच्या तक्रारींचे मूळ कारण सदोष आहारपद्धतीमध्ये आहे. आपली पूर्वापार पान वाढायची पद्धत लक्षात घ्या. सर्व प्रकारचे रस व सर्व अन्नघटक सुबकरित्या, स्वच्छता राखून व्यवस्थित वाढलेले असायचं. आंबट, तुरट, कडू, गोड, तिखट रस, कच्च्या फळभाज्यांच्या कोशिंबिरी, मोड आणलेले कडधान्य, पालेभाजी सगळ्याचा क्रम ठरलेला असायचा. त्याशिवाय देवाचे नाव घेऊन, अन्न उत्पन्न करणार्याचे, रांधणार्या व वाढणार्या व्यक्तीचे आभार व्यक्त करुन भोजन करणे हा जणू एक साग्रसंगीत सोहळाच! पण यामुळे भोजन करणारा तृप्त होऊन जाई. मन व पोट दोन्हीही शांत राहात असे. परंतु आता तयार प्रक्रियायुक्त अन्नप्रकारांचे महत्त्व वाढल्यामुळे केव्हाही, कधीही कचवचत खाणे, काम करता करता, प्रवास करता करता खाणे,वेळी अवेळी शीत पेये घेणे यामुळे पोटाला अक्षरक्ष: कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पचनसंस्थेचे व इतर विकार टाळण्यासाठी घरगुती, सात्विक जेवणावर भर द्यायला हवा. प्रदेश व हवामानानुसार इष्ट असा आहार ठेवावा.
अति प्रमाणात मीठ, साखर व सोडा यांचा वापर टाळावा. मांसाहार शक्यतो टाळावा. पर्यावरणाचे भान राखावे, असे केल्याने कमीतकमी रोगांना तोंड द्यावे लागते. सहसा रोग होतच नाहीत.
होमिओपॅथी : बेंगलोरला आय. टी. क्षेत्रात काम करणारा एक तरुण, आपण त्याला अक्षय म्हणूया! अक्षयचें मुळव्याधीचं
झालेलं. त्याला आधीच दोन वर्षापासून त्रास होता. पण आता ऑपरेशन होऊनही पुन्हा मुळव्याधीचा त्रास व्हायला लागला. एक तर कामाची, खाण्याची, झोपण्याची एकही ठराविक वेळ नाही. शिवाय भरपूर मानसिक ताण, बद्धकोष्ठाचा त्रास व्हायचाच व तीव्र वेदना, रक्ती मूळव्याध! त्याची फक्त लक्षणं आणि हिस्टरी पाहून एक होमिओपॅथिक औषध सहावेळा घ्यायला सांगितलं असता एका महिन्यातच त्रास पूर्णपणे थांबला. कोंडायुक्त चपाती-भाकरी व भरपूर पालेभाज्यांचा आहारात समावेश करायला सांगितल्यावर बद्धकोष्ठाची तक्रार कमी झाली.
सगळ्या दिनक्रमाची वेळ ठरवून योजल्याप्रमाणे आहार घेतल्यावर पुन्हा अक्षयला कसलाही त्रास झाला नाही.
नक्सवोमिका, सल्फर, अॅस्क्युलस, हॅमेमॅलेस, कॅप्सीकम अशी अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये उपयोगी आहेत.
बाराक्षार : कॅलकेरिया फ्लूर 3×, फेरम फॉस, 3×, काली मूर 3×, कॅल्केरिया फॉस 3×, इत्यादी औषधांचे मिश्रण मुळव्याधीवर उपयुक्त आहे.
निसर्गोपचार : रात्रभर पाण्यात भिजवलेले सुके अंजीर कुस्करुन पाण्यासकट प्यावेत. पांढरा मुळा 10 ग्रॅम (किसलेला) व एक चमचा मध एकत्र करुन दिवसातून दोनदा खावा. कारल्याच्या मूळीचा लेप मोडावर दोनदा खावा. कारल्याच्या मुळीचा लेप मोडावर लावल्याने दाह कमी होतो. तिळाचा काढा मूळव्याधीवर उपयुक्त ठरतो. 20 ग्रॅम तीळ साडेतीन कप पाण्यात उकळवावे. पाणी एक तृतीयांश आटवावे. ते तीळ पाणी वाटून लोणी घालून रुग्णास खायला द्यावे. मूळव्याधीतून रक्त जायचे थांबते. गव्हांकुराचा रस आतड्यांतील दूषीत द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. रोज सकाळी ताजा गव्हांकुराचा रस अनोश्यापोटी घ्यावा.गव्हांकुराचा रस आतड्यांतील दूषीत द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. रोज सकाळी ताजा गव्हांकुराचा रस अनोश्यापोटी घ्यावा.
मूळव्याध हा मूळ आजार नसून अनेक आजार व विकारांचे ते लक्षण आहे. त्यावर योग्यवेळी उपचार करणे गरजेचे असते.
#DrSonaliSarnobat
9916106896
9964946918