कॅम्प भागातील दवाखाने त्वरित सुरू करावे अशी मागणी भीम सेनेने केली आहे.या मागणीचे निवेदन भीम सेनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ ,जिल्हाधिकारी यांना दिले.
कॅम्प भागातील दवाखाने अद्याप उघडले नसल्याने भीम सेनेने अनोखे आंदोलन करून दवाखाने घडण्याची मागणी केली आहे.त्यांनी बंद असलेल्या दवाखान्याच्या दरवाजावर फुले ठेवून दवाखाने उघडण्याची मागणी केली आहे.
दवाखाने बंद असल्यामुळे काही दिवसांपूर्वी उपचार मिळाले नसल्याने एका तरुणीला प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे.प्रशासनाने आदेश बजावून देखील अजून दवाखाने उघडण्यात आलेले नाहीत.
दवाखाने उघडण्याची मागणी करणारे निवेदन देखील कॅन्टोन्मेंट सीईओ आणि कॅम्प पोलीस स्टेशनला दिले आहे.भीम सेना बेळगावचे अध्यक्ष नारायण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले.यावेळी शबोद्दीन बॉम्बेवाले,कुनलराव कांबळे,पावन कांबळे,सागर छब्रि, पारस रावल,श्याम छाब्रि उपस्थित होते.