कर्नाटक सरकारच्या नव्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्यप्रदेश या सहा सर्वाधिक कोरोनाबाधित हाय रिस्क राज्यातून येणाऱ्यांचे यापुढे 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि 7 दिवसांचे होम काॅरन्टाईन केले जाणार आहे.
रेल्वे, रस्ते, हवाई आणि जलमार्गाने कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांचे यापुढे सात दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि सात दिवसांचे होम काॅरन्टाईन केले जाईल. उपरोक्त हाय रिस्क राज्यांव्यतिरिक्त अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाचे मात्र 14 दिवसांचे काॅरन्टाईन केले जाईल. यासाठी सेवा सिंधू वेबसाईटवर नावे नोंदविणे अनिवार्य असणार आहे हवाई मार्गाने प्रवास करून आलेल्या बहुतांश सर्वांकडे सेवा सिंधू हेल्पलाइन असते. त्यामुळे त्यांना सेवासिंधूसाठी नांव नोंदवण्याची अथवा ई -पासची गरज नाही. प्रवाशांचे 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन पूर्ण झाल्यानंतर कोरोना तपासणीत ते निगेटिव आढळून आल्यास त्यांना 7 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केले जाणार आहे. हाय रिस्क राज्यातून आलेल्या गरोदर महिला, 80 वर्षावरील वृद्ध, गंभीर व्याधीग्रस्त रुग्ण आणि 10 वर्षाखालील मुलांना ते निगेटिव्ह आढळल्यानंतर एका सहाय्यकासह त्यांचे होम काॅरन्टाईन केले जाईल.
काही अपरिहार्य परिस्थितीत तातडीचे कामे असणाऱ्या व्यापारी वगैरे लोकांना त्यांनी जर आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून मिळालेला कोरोना निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर केल्यास त्यांना काॅरन्टाईन माफ केले जाणार आहे. जर त्यांनी दाखला सादर केला नाही तर त्यांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन व्हावे लागेल आणि अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच ते आपल्या कामाला जाऊ शकतील. काॅरन्टाईन माफ होण्यासाठी जो दाखला सादर करावयाचा आहे तो प्रवासाच्या तारखेपेक्षा दोन दिवस जुना नसावा, असे कळविण्यात आले आहे.