Monday, December 30, 2024

/

राजेंद्र चोळण यांनी दिली कोरोंना हॉटस्पॉट हिरेबागेवाडीला भेट

 belgaum

हिरेबागेवाडी येथे कोरोना बाधित मोठ्या संख्येने आढळल्याने अनेकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देखील तेथील शेती व इतर व्यवसाय बंद पडले आहेत. याचा अहवाल घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक राजेंद्र चोळण यांनी नुकतीच हिरेबागेवाडी गावाला भेट दिली आहे.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र, पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी, तहसीलदार आर के कुलकर्णी या सह आदी मान्यवर हिरेबागेवाडी येथे भेट दिली आहे.

Hirebagewadi
Hirebagewadi

सध्या हिरेबागेवाडी येथे एकूण 48 रुग्ण सापडले असून एका 80 वर्षे वृद्धेचा मृत्यू झाला आहे तर 30 जण कोरोणा मुक्त झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आता एकूण 17 रुग्ण बरे होण्याच्या प्रतीक्षेत हे गाव आहे. अजूनही काही दिवस हे गाव बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी राजेंद्र यांनी भेट घेतली आहे.

हिरेबागेवाडी येथील शेतकऱ्यांनी तातडीने शेती करावी व काही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आणखीन काही दिवस असेच सहन करा. कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक सुविधा देण्यात येतील असे यावेळी राजेंद्र चोळण सांगितले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.