समाजातील दुर्बल घटकासाठी तात्काळ पॅकेज जाहीर करा अशी मागणी आमदार अनिल बेनके यांची मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याकडे केली आहे. बुधवारी बेंगलोर येथील निवास स्थानावर भेट घेत त्यांनी ही मागणी केली आहे.
कोरोनाच्या महामारीत अनेकांचे जीवन जगणे कठीण बनले आहे. त्यामुळे दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्याकडे केली आहे. त्यांनी बेंगलोर येथील मुख्यमंत्र्यांच्या कावेरी निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. सध्या चर्मकार कामगार मंदिरातील पुजारी आणि पत्रकारांना मोठे आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे या घटकांना विशेष पॅकेज जाहीर करून त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.
लॉक डाऊनमध्ये चर्मकार कामगार यांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तर याच परिस्थितीत मंदिरातील पुजारीवरही अशी अवस्था झाली आहे. कोरोना युद्धांमध्ये असणाऱ्या पत्रकारांनाही आर्थिक चणचण भासली आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. तर अनेक पत्रकारांना कामावरून कमी करण्यात आले आहे आणि काहींचा पगार कपात करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांचे मोठे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या दुर्बल घटकांना मदत करावी अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.
चर्मकार कामगार मंदिर पुजारी यांची अवस्था ही सध्या बिकट बनली आहे. लॉक डाऊन परिस्थितीत त्यांचे सर्व व्यवसाय आणि मंदिरे बंद असल्यामुळे पुरोहितांचे ही चांगली अडचण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या दुर्बल घटकाकडे जातीने लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी बेंगलोर येथील कावेरी निवासस्थानी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेऊन केली आहे. आमदार अनिल बेनके यांच्या या कार्याबद्दल अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.