कॅम्प भागातील एका तरुणीला वेळेत उपचार मिळाले नसल्याने चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता.दवाखाने कॅम्प भागातील बंद असल्यामुळे त्या तरुणीला उपचार मिळाले नव्हते.याबद्दल बेळगाव लाईव्हने वाचा फोडली होती.त्याची गंभीर दखल आरोग्य खात्याने घेऊन 464 दवाखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आरोग्य खात्याने जिल्ह्यातील 464 दवाखान्यांना सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्या बद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.लॉक डाऊन कालावधीत दवाखाना उघडून सरकारचे अँप डाऊनलोड करणे आवश्यक होते.पण 464 दवाखान्यांनी हे अँप डाऊन लोड केले नाही.
हे अँप डाऊनलोड करून दररोज येणाऱ्या रुग्णाची माहिती भरून आरोग्य खात्याला पाठवणे अपेक्षित होते.त्यामुळे कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णावर लक्ष ठेवणे सहजसाध्य होणार होते.पण 464 दवाखान्यांनी हे अँप डाऊन लोड केले नाही आणि लॉक डाऊन कालावधीत दवाखाने उघडले नाहीत म्हणून करणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
बेळगाव मध्ये अनेक खाजगी दवाखाने बंद होते लॉक डाऊन काळात लोकांना याचा फटका बसला होता अखेर आरोग्य खात्याने जागे होऊन त्यांना नोटीस बजावली आहे.
ही बातमी देखील अवश्य वाचा
कॅम्प मध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणीचा मृत्यू