गुरुवारी दुपारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्णांची वाढ झाली असून एकूण पोजिटीव्ह रुग्ण संख्या 119 वर पोहोचली आहे.जिल्ह्यात बागलकोट मधील 8 पोजिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे त्यामुळे हा आकडा सव्वाशे पार झाला आहे.
गुरुवारी नवीन 9 पोजिटीव्ह रुग्ण सापडले त्यांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय आहे ते कोणत्या गावचे रहिवाशी आहेत त्याचा तपशील खालील प्रमाणे-
पी-1496 या रामदुर्ग तालुक्यातील कल्लूर गावच्या सात महिन्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. रामदुर्ग तालुक्यात या लहान मुलीच्या माध्यमातून कोरोनाची एन्ट्री झाली आहे.7 मे रोजी महाराष्ट्र येथील कोल्हापूर मधून आलेल्या कुटुंबाला बटकुरकी गावात क्वांरंटाइन करण्यात आले होते या कुटुंबापैकी सात महिन्याच्या बाळाला कोरोना जडला आहे.
झारखंड येथील सम्मेद शिखर्जी येथील धार्मिक स्थळाला भेट देऊन आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा जडली आहे पी-1489 या 65 वर्षीय वृद्धेला, पी 1490 या 63 वर्षीय वृद्धेला तर पी 1493 या 75 वर्षीय वृद्ध पोजिटीव्ह आला आहे. दीड महिन्यापूर्वी 15 जणांच्या सोबत ते सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळी जाऊन आले होते.मे 6 रोजी पासून कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी मध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते.
राजस्थान मधील अजमेर मधून वापस आलेल्या आणखी दोघांना पोजिटीव्ह कोरोनाची लक्षणे दिसली आहेत.बैलहोंगल तालुक्यातील संपगाव गावच्या 24 वर्षीय युवक पी 1491 तर 25 वर्षीय युवक पी 1492 हे कोरोना पीडित आहेत 8 मे रोजी पासून संपगाव हायस्कूल मध्ये अजमेर रिटर्न असलेले 8 जण इन्स्टिट्युशनल क्वांरंटाइन होते त्यात दोघे पोजिटीव्ह आहेत.
पी 721 या हिरेबागेवाडी येथील पोजिटीव्हच्या संपर्कात आलेल्या पी 1562 या 43 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. या पोजिटीव्ह नंतर हिरेबागेवाडीचा आकडा 49 वर पोहोचला आहे. मुंबई रिटर्न असलेल्या हुक्केरी येथील दोघांना कोरोना झाला आहे त्यामुळे मुंबई लिंक मधील वाढ आहे. बाहेरील राज्यातून आलेले 8 व प्रथम संपर्कात आलेला एक जण असे 9 जण गुरुवारी पोजिटीव्ह मिळाले आहेत.
बैलहोंगल कागवाड रामदुर्ग या तीन नवीन ठिकाणी जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरवले आहेत.बेळगाव 119 तर बागलकोटचे बेळगावात उपचार घेत असलेले 8 असे मिळून 127 पोजिटीव्ह रुग्ण बेळगावात आहेत.