बेळगावात 31 मे रोजी नवीन 13 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बेळगावचा आकडा वाढत 147 वरून 160 ला पोहोचला आहे.तर कर्नाटक राज्याने देखील 3000 रुग्णांचा टप्पा पार केला आहे रविवारी राज्यात नवीन 299 रुग्ण सापडले आहेत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 3221 वर पोहोचली आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्र रिटर्न रुग्ण वाढले असून रविवारी सापडलेल्या 13 पैकी 11 रुग्ण महाराष्ट्र रिटर्न तर दोघे जण दिल्लीतुन परतले होते. या 13 रुग्णां नुसार राज्य आरोग्य खात्याच्या बुलेटिन नुसार एकूण आकडा 160 तर बेळगाव जिल्हा आरोग्य खाते बुलेटिन नुसार हा आकडा 162 झाला आहे.
आज सापडलेल्या रुग्णापैकी दोघे जण बेळगाव तालुक्यातील अगसगे गावचे आहेत तर आणखी एक जण माळ्याकट्टी गावचा आहे या शिवाय पाच रुग्ण हे चिकोडी तालुक्यातील आसपासच्या गावातील आहेत.
अगसगे येथील दोघे आणि माळ्यानट्टी येथील एक असे तिघेही महाराष्ट्र रिटर्न असून क्वारंटाइन अवधी संपवून अहवाल यायच्या अगोदर घरी परतले होते. अगसगे तुरमुरी आणि माळ्यानट्टी असे नवीन पोजिटिव्ह रुग्ण हे सर्वच महाराष्ट्र रिटर्न आहेत त्यामुळे बेळगाव तालुक्यात देखील महाराष्ट्र रिटर्न पासून धोका वाढला आहे.
चिकोडी तालुक्यातील आसपासच्या गावातील असलेले पाच जण देखील महाराष्ट्र रिटर्न असल्याची माहिती मिळत आहे. दोघे जण दिल्ली रिटर्न आहेत आणखी तिघांची माहिती मिळणे बाकी आहे.