रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीहून 15 ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे आज सोमवार पासून आरक्षण सुरू होईल तर उद्या मंगळवारी पासून या ट्रेन धावतील .रेल्वे स्थानकावर कोणतेही बुकिंग होणार नाही याचे बुकिंग आय आर टी सी द्वारे होणार आहे अशी माहिती रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी दिली
सोमवारी सकाळी बेळगावात ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन या रेल्वे सुरू झाल्या आहेत प्रवाश्यांनी सोशल डिस्टन्स बाळगून मास्क परिधान करून प्रवास करायचा आहे.सॅनिटायजरचा वापर करणे स्वच्छता ठेवणे रेल्वे स्थानकावर गर्दी न करणे आदी नियम प्रवाश्यांनी पाळावे.केवळ आरक्षण असलेल्यानी स्थानकावर जावे खाली लोकांनी स्टेशनवर गर्दी करू नये अश्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
लॉक बाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान गृह मंत्रालय आणि राज्याचे मुख्यमंत्री लॉक डाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केलं.