राज्यात एकीकडे काल एका दिवसांत 45 कोटींची मद्य विक्री झालयाची माहिती समोर आली असताना बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल अंदाजे 1 लाख 30 हजार लिटर दारू तर तीस हजार लिटर बियर विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य अबकारी खात्याने राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 42 दिवसां नंतर दारू विक्रीला सोमवारी सुरूवात केली होती पहिल्याच दिवशी लोकांनी वाईन शॉप समोर तोबा गर्दी करत दारू खरेदी केली होती. गेले दीड महिना बंद असलेली दारू दुकान एकदम खुली केल्या नंतर बेळगावं शहरात देखील दारू दुकाना समोर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
बेळगाव जिल्ह्यात अंदाजे एक लाख तीस हजार लिटर दारू तर 30 हजार लिटल बियर विक्री झाल्याची माहिती अबकारी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे मात्र मंगळवारी दुपारी पर्यंत बरोबर आकडा बाहेर येणार आहे. एक महिना पुरेल इतकी दारू अबकारी खात्याकडे बेळगावात स्टॉक आहे काल पहिल्या दिवशीच अनेक दुकाने खाली झाली होती. खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याने हा आकडा वाढला आहे.
मंगळवारी दुपारी पर्यंत स्टॉक संपलेल्या दुकानांना मद्य पुरवले जाणार आहे.आज दुपारी पासून नवीन स्टॉक वर विक्री होणाऱ्या मध्यावर 6टक्के दर वाढणार आहे अशी ही माहिती मिळाली आहे.