राज्याचे जलसिंचन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज बुधवारी विमल फाउंडेशनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील फाउंडेशनच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
राज्याच्या जलसिंचन खात्याचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विमल फाउंडेशन कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रवेशद्वारावर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मंत्री रमेश जारकीहोळी यांचे स्वागत केले. याप्रसंगी रमेश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे फेटा बांधून तसेच शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे मंत्री जारकीहोळी यांनी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा सन्मान करून मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. सध्या कोरोना प्रादुर्भावाचा काळात आणि येत्या पावसाळ्यात आपण सर्वतोपरी मदत करण्यास उपलब्ध असू असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शहरात सखल भागात राहणाऱ्या आणि मागील वर्षी पूर परिस्थितीला सामोरे गेलेल्या नागरिकांना यावेळी आपल्याकडून आवश्यक ते सहाय्य करण्याची ग्वाहीही मंत्री जारकीहोळी यांनी दिली.
विमल फाउंडेशनला दिलेल्या आपल्या सदिच्छा भेटी प्रसंगी जलसिंचन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी किरण जाधव यांच्या समवेत पिण्याच्या पाण्याची समस्या शहरातील स्वच्छता आदी विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि हितचिंतक उपस्थित होते.