कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कर्नाटक हद्दीतील कोगनोळी चेक पोस्ट केवळ कर्नाटकात नव्हे तर देशात एक आदर्श चेक पोस्ट म्हणून ओळखला जात आहे.चोवीस तास हा चेकपोस्ट जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून तेथे बारा पीएसआय ,सहा सीपीआय आणि शंभरहून अधिक आरोग्य,महसूल खात्याचे कर्मचारी सेवा बजावत असतात.
तेथे एकूण तीन तपासणी नाके आहेत.पहिल्या नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या व्यक्तींचा ई पास तपासला जातो.दुसऱ्या चेक पोस्ट वर वाहनातील व्यक्तींना खाली उतरवून आरोग्य तपासणी केली जाते.तिसऱ्या चेक पोस्ट वर पोलीस सगळ्या कागदपत्रांची तपासणी करून सिंधू अँपद्वारे ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत तेथे कळवून प्रवाशांची सगळी माहिती संग्रहित केली जाते.

चेक पोस्टवर बारा काउंटर आहेत.चेक पोस्टवर येणाऱ्या व्यक्तीसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते.तसेच निवासाची देखील सोय करण्यात आली आहे.त्यामुळे कोगनोळी चेकपोस्टचे केवळ राज्यात नव्हे तर देशातील आदर्श चेकपोस्ट म्हणून कौतुक होत आहे.