लॉक डाऊन काळात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गावठी दारू ला उधाण आले आहे. मात्र पोलिसांनीही अशा दारू विक्रेत्यावर धडक कारवाई करून त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत नुकतेच हुल्यानुर व बुडऱ्यानूर येथे पोलिसांनी धाड टाकून गावठी दारू जप्त केली आहे.
छाप्यात गावलेले दारूचे कॅन रसायन व इतर साहित्य जाळून टाकण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली असून दारू विकणाऱ्यावर चांगलाच चाप बसला आहे. यापुढे कोणत्याही नागरिकांनी जर दारू विक्री केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मारिहाळ पोलिसांचे एक पथक संबंधित परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी गावठी दारू अवैधरित्या विक्री करत असल्यास दिसून आले. अचानक धाड टाकून दारू ठेवण्यात आलेल्या तसेच इतर साहित्य जप्त करून ते जाळून टाकण्यात आले आहे.याचबरोबर दारूसाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहर तसेच तालुक्यात अबकारी खात्याने बेकायदा दारू विक्री करणाऱ्या चांगलाच चाप दिला आहे. याबरोबर अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर ही कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे दारू विकणार्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी गावठी दारू विक्री सुरू आहे. त्यांच्यावर अबकारी खातें नजर ठेवून आहे. यापुढेही अशीच कारवाई करणार असे सांगण्यात आले आहे.