Monday, January 13, 2025

/

हुश्यश्य..! तळीरामांची एकदाची प्रतीक्षा संपली

 belgaum

मागील महिन्याभरापासून लॉक डाऊन असल्यामुळे तळीरामांची चांगलीच गोची झाली होती. मात्र नुकतीच अबकारी आयुक्तांनी नियम व अटी लादून सोमवार दिनांक 4 मे पासून दारू दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तळीरामातून एकदाची प्रतीक्षा संपली बाबा असेच ऐकावयास मिळत आहे.

सर्वच मद्याची दुकाने बंद असल्याने तळीराम गावठी तसेच बेकायदेशीर दारूकडे वळले होते. विशेष म्हणजे काजू कडे अनेक तळीरामांना लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे गावठी दारू बरोबरच काजू फेणी यांच्याही विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अनेकांनी तिप्पट दर लावून दारू विक्री केल्याचे उघडकीस आले होते. आता मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने तळीराम मात्र सुखावले आहेत.

गेल्या महिनाभरापासून बंद असणारी मद्य दुकाने आता उघडणार असल्याचे संकेत राज्य अबकारी विभागाने दिले आहेत. 2 मे रोजी जाहीर केलेल्या आदेश पत्रात सदर ही बाब नमूद केली असून त्या संबधितचे नियम राज्य सरकारने घालून दिले आहेत.

केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था अखत्यातीरीतील कंटेनमेंट झोन मध्ये कोणत्याही प्रकारची दारू दुकाने उघडली जाणार नाहीत.

केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था अखत्यातीरीतील कंटेनमेंट झोन वगळून अन्यत्र ठिकाणी असलेले सी. एल – 2, सी एल 11- सी ( एम . एस . आई . एल ) प्रकारची मद्य दुकानी उघडून दारू विक्री आणि केएसबीपीएल डेपो तेवढेच सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर आस्थापने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरु राहतील. केवळ एकावेळी 5 लोकांचा अनुमती असणार आहे आणि 6 फुटांचे सामाजिक अंतर बाळगणे आवश्यक आहे. मद्य विक्री करणारे आणि खरेदी करायला येणारे यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. जंतू नाशकाचा वापर करणे अनिवार्य आहे.

फक्त एकल असणारी सीएल-2, सीएल1-सी ( एम. एस.आय.एल ) आस्थापने यांना हे लागू असेल मॉल किंवा सुपरमार्केट मधील मद्य विक्रीला अनुमती नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही दिलेल्या पत्रकात नियमांच्या अटी घालण्यात आल्या आहेत मद्याची दुकाने सुरू झाल्यामुळे तळीराम आतून मात्र समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.