कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत हवाई अथवा अन्य मार्गाने परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने कांही निकष आणि प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
देशांतर्गत हवाई अथवा अन्य मार्गाने परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने अनिवार्य निकष आणि प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. काॅरन्टाईन निकष : कोरोनाचा उच्च संसर्ग असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान व मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे 7 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन त्यानंतर 7 दिवसांचे होम काॅरन्टाईन केले जाईल. या राज्याने व्यतिरिक्त अन्य राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे 14 दिवसांचे होम काॅरन्टाईन केले जाईल. आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रवासाच्या तारखेच्या दोन दिवस आधी मिळालेला निगेटिव्ह अहवालाचा दाखला सादर करणाऱ्या प्रवाशांना काॅरन्टाईन माफ असणार आहे. जोडपत्रात काॅरन्टाईन संबंधीचा संपूर्ण तपशील नमूद आहे.
ई-पास : परराज्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे राज्य शासनाच्या सेवासिंधू पोर्टलकडून (https://sevasindhu.karnataka.gov.in/sevasindhu/English) दिला जाणारा ई-पास असणे आवश्यक आहे. विमानतळ अथवा रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी आणि बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1ली पायरी : विमान/ रेल्वे प्रवास प्रारंभाच्या 2 तास आधी नागरी उड्डाण / रेल्वेचा नियुक्त अधिकारी प्रवाशांचे नांव, मोबाईल नंबर, पीएनआर, विमान / रेल्वे क्रमांक, विमान /रेल्वे प्रवासाची तारीख आदी माहिती अपलोड करेल किंवा सदर माहिती सिस्टीममध्ये अपलोड करण्यासाठी कर्नाटक राज्य कोव्हीड -19 वाॅररूमकडे (email- [email protected]) पाठवेल.
2री पायरी : प्रवासाच्या प्रारंभी प्रवाशांनी सेवा सिंधू पोर्टलकडे दिलेल्या सर्व माहितीची पोचपावती प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी एसएमएसद्वारे मोबाइलवर उपलब्ध केली जाईल. प्रवासाच्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर त्याठिकाणी प्रवाशांनी सदर माहिती चेकइन काउंटर / टीटीईकडे सादर करावी. पोर्टलवरील ही सुविधा 24 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रक्रियेची दुसरी पायरी ही पहिल्या पायरीचा स्वतंत्र भाग असेल.
3 री पायरी : प्रवाशांच्या अपलोड केलेल्या माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर अर्जाला स्वयंचलित मान्यता मिळवून ई -पास प्रवाशांच्या मोबाईल फोनशी प्रवासाच्या इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वी जोडला जाईल. 4 थी पायरी : जोडपत्र नमूद केल्याप्रमाणे प्रवाशांचे काॅरन्टाईन केले जाईल.
वैद्यकीय व्यावसायिक, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी आणि ॲम्बुलन्स कर्मचाऱ्यांना 14 दिवस होम काॅरन्टाईन केले जाईल. त्याचप्रमाणे संरक्षण दल, पॅरामिलिटरी फोर्स, रेल्वे, डीआरडीओ, आयएसआरओ आणि पीएसयुएस मधील व्यक्तींचे संबंधित अतिथिगृह अथवा संबंधित विभागाच्या काॅरन्टाईन सुविधा असलेल्या ठिकाणी 14 दिवस इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन केले जाईल.