भांदूर गल्ली बेळगाव येथील एका ब्रह्मचाऱ्याचे अपहरण अडीच महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मालमत्ता हडपण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. मात्र मार्केट पोलिसांनी हा कट उधळून लावला होता.
यामधील दहा जणांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती. यामधील एकूण सात जणांना जामीन मिळाला आहे. बुधवारी दोघा जणांना तर गुरुवारी पाच जणांना असे एकूण सात जणांना जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
बुधवारी संजय प्रकाश कौजलगी उर्फ बजंत्री वय 34 राहणार अनगोळ, अमित परशराम धामणेकर वय 30 राहणार रयत गल्ली वडगाव तर गुरुवारी विनायक शंकर प्रधान वय 40 राहणार महाद्वार रोड, अमित यल्लाप्पा मजगावी वय 30 राहणार फुलबाग गल्ली, सुरेश महादेव पाटील वय 44 राहणार कडलगे तालुका गडहिंग्लज, चेतन नारायण पाटील वय 25 राहणार बेळवट्टी, राजू ज्ञानेश्वर गोणी वय 45 राहणार मारुती नगर तिसरा क्रॉस या पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी त्यांनी अण्णासाहेब श्रीकांत चौगुले वय 40 यांचे अडीच महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. याप्रकरणी प्रारंभी बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर मार्केट पोलिसांनी याचा छडा लावून हे अपहरण प्रकरण उघडकीस आणले. आतापर्यंत एकूण सात जणांना जामीन मंजूर झाला आहे. गुरुवारी मंजूर झालेल्या जामीन साठी एड शामसुंदर पत्तार, एड हेमराज बेंच्चनांवर यांनी काम पाहिले आहे. सहावे जे एम एफ सी न्यायालयाने 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार पोलिस तपास कार्यात कोणताही अडथळा आणू नये या अटींवर जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे.