महाराष्ट्र,तामिळनाडू,गुजरात,मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कर्नाटकात येणाऱ्या विमानाची संख्या कमी करावी अशी विनंती कर्नाटक
सरकारने नागरी विमान उड्डाण मंत्रालयाला केली आहे.या राज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना फैलाव होत असल्याने कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.
या राज्यातून येणाऱ्या विमानावर बंदी घातलेली नाही असा खुलासा कायदा मंत्री मधूस्वामी यांनी केला आहे.
मोठ्या संख्येने विमानाने प्रवासी आले तर क्वांरंटाईन करण्याच्या सुविधा करणे अवघड जाणार असल्याने विमानांची संख्या कमी करण्याचे आणि रस्त्याच्या मार्गे वाहनातून येणाऱ्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे बंद करण्याचा कोणताही आदेश कर्नाटक सरकारकडून आलेला नाही.कर्नाटक सरकारच्या कडून असा आदेश आल्यास त्याची माहिती आम्ही रेल्वे बोर्डाला आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला देऊ अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.