पाकिस्तानात आलेल्या टोळधाडीने आता भारतात राजस्थानच्या वाळवंटातून प्रवेश केला आहे.या टोळधाडीने महाराष्ट्रातील विदर्भात प्रवेश केला असून ते पिके फस्त करत आहेत.
ही टोळधाड नागपूरहून बिदर, गुलबर्गा कडे येण्याची शक्यता आहे.पण वाऱ्याची दिशा कशी असेल त्यावरून टोळधाड कोठे जाणार हे ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर टोळधाडीचा धोका लक्षात घेऊन बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यात हाय अलर्ट कृषी विभागाने घोषित केला आहे.
गावागावात दवंडी पेटवून टोळधाडीची माहिती देण्यात येत आहे.सगळ्या कृषी सहाय्यता केंद्रात टोळधाडीवर मारायच्या औषधांचा साठा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना टोळधाडी बाबत जागरूक केले जात आहे.टोळधाड आली तरी त्याला तोंड देण्यास कृषिखात्याने सगळी तयारी केलेली आहे असे वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले.