कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रहदारीमुळे सतत धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कपिलेश्वर कॉलनीतील रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला असून या रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वेगवेगळ्या कारणासाठी कपिलेश्वर कॉलनीतील रस्ता खणण्यात आला होता.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे.कपिलेश्वर कॉलनीतून अवजड वाहने वेगाने जातात त्यामुळे इमारती,घरे हादरून लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे.
नागरिक सतत भीतीच्या छायेखाली राहत आहेत.महानगरपालिकेने त्वरित रस्त्याचे काम करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.