लॉक डाऊन काळात दुबईत अडकलेल्या कर्नाटकवासींना भारतात परत आणण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवार दि 12 रोजी विशेष विमानाने त्यांना मंगळूर येथे आणण्यात येणार आहे. या विमानातून काही पर राज्यातील नागरिकही मंगळूर ला दाखल होणार आहेत.
या विमानप्रवासासाठी गरोदर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. पूर्वी हे विमान 14 मे ला येणार होते पण आता ते दोन दिवस आधी 12 मे ला येऊन पोचणार आहे.
केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी या विमानाची व्यवस्था करून आलेल्या सर्वांचेच आभार मानले आहेत. एअर इंडियाचे हे विमान 12 रोजी दुपारी 4.10 ला निघून रात्री 9.10 ला मंगळूर ला पोचेल. दुबईत नोकरी धंदा आणि पर्यटनासाठी गेलेले अनेकजण अडकले आहेत. पण सगळ्यांना आणणे शक्य नसल्यामुळे फक्त गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना प्राधान्य देऊन आणण्यात येईल.
सर्व प्रवाशांना मंगळूर येथेच कॉरन्टीन केले जाणार आहे. उडपी आणि केरळ येथील प्रवाशांना चाचणी करून घरी जाण्याची संधी दिली जाईल पण पुढे त्यांना किमान 14 दिवस घरातून बाहेर पडता येणार नाही.