ज्या दिवसापासून लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे त्या दिवसापासून कांगली गल्लीचे सर्व पंच मंडळी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अविरतपणे सुरू केलेल्या कामाची त्यांच्या तोड नाही. त्यामुळे कांगली गल्लीचे काम हे कौतुकास्पद आहे, असे मत बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले आहे.
कांगली गल्लीने लॉक डाऊन काळात संपूर्ण बेळगाव भर सिनीटायझर पुरवण्याचे काम केले आहे. मागील वीस ते पंचवीस दिवसापासून त्यांनी दररोज रात्रीच्या भोजनाची व्यवस्थाही केली आहे याचबरोबर सोशल डिस्टन्स ठेवून त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे. जोपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे तोपर्यंत ही सेवा अशीच कायम राहणार असे आश्वासन देण्यात आले आहे.
त्यामुळे त्यांच्या कार्याने अनेकांनी प्रेरणा घेऊन असेच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन देखील आमदार अनिल बेनके यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे बेळगाव शहरात सुरुवातीला त्यांनी सामजिक कार्य केले होते. सांगली गल्लीतील नागरिकांनी अनेक साहित्य वितरित करून अनेकांची मदत केली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कार्याची पोचपावती दिली आहे. त्यांच्या या कार्यात पंच मंडळी आणि कार्यकर्ते अविरतपणे काम करत आहेत.
कांगली गल्ली ही बेळगाव येथील मध्यवर्ती भागातील गल्ली असून त्यांच्या सामाजिक कार्याने अनेकांनी प्रेरणा घेऊन असेच कार्य करत राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.यावेळी एकता युवक मंडळाचे कार्यकर्ते, बाळकृष्ण तोपीनकट्टी नारायण किटवाडकर ,आदी उपस्थित होते.