जिवंत किंवा मृत मला माझ्या कुटुंबासमवेत राहायचे आहे. लॉकडाऊन आणि दुसरे काहीही मला माझ्या घरी जाण्यापासून रोखू शकत नाही. तामिळनाडू येथील सालेम येथुन कामानिमित्त आलेला आणि स्थलांतरित कामगार ही ओळख असलेला पी वेलू बोलत होता. एक पाण्याची बाटली आणि काही कपडे घेऊन तो चालत निघाला आहे. 720 किलो मीटर चे अंतर पायी तुडवत तो बेळगावहून सालेमला जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून त्याने अन्नाचा एक कणही घेतला नाही.
खिश्यात दमडीही नसल्याने त्याने आपला पायी प्रवास सुरु केला आहे. सुवर्ण विधानसौद जवळ तो बेळगाव live ला भेटला. त्याने आपली भावना व्यक्त केली. घरी जायचे असेल तर एक ऍप लोड कर आणि तुझी माहिती भर अशी माहिती त्याला देण्यात आली होती पण आपल्याकडे स्मार्टफोन नाही आणि तो कसा वापरायचा हे सुद्धा मला माहित नाही. पण आज माणसे माणसाला थेट मदत करू शकत नाहीत. सगळे जगणे स्मार्टफोन वर आधारित आहे. पण मला फरक पडत नाही असे त्याने सांगितले आहे
वेलू हा बोअरवेल खोदण्याच्या कामात एक्सपर्ट आहे. कंत्राटदारावर त्याचे पोट चालते.एक महिन्यापूर्वी या कंत्राटदाराने तुला सांभाळायला होत नाही तू तुझ्या पोटाची काळजी आता तू घे असं सांगून टाकलं. अशा परिस्थितीत जगणं कठीण झाल्यामुळे वेलूने परत जाण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबाचे काय हाल सुरू आहेत याची काळजी आहे. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यासाठी कितीही त्रास होउदे तो घेण्याची आपली तयारी आहे. कायद्याने कोणती शिक्षा झाली तर ती सुद्धा भोगण्यास तयार आहे पण चालत जाणार आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार असे वेलूने सांगितले आहे.
Have you provided food to him?