Sunday, January 12, 2025

/

आंतर जिल्हा संचारासाठी पर राज्यात जाणाऱ्यांसाठी असे मिळणार पास

 belgaum

लॉक डाऊन काळात बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटक राज्याच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी कामगार विद्यार्थी आणि प्रवाश्यांना जाण्याची संधी आहे अशी महितीबजिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली आहे.बेळगाव जिल्ह्यातून राज्याच्या इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्याना एकच वेळा,एक दिवसासाठी आणि एकदाच पास दिली जाईल.

आंतर जिल्हा प्रवास करण्यासाठी बेळगाव तालुका वगळता उर्वरित जिल्ह्यातील इतर तालुक्यासाठी निवासी जिल्हाधिकारी पास देतील तर बेळगाव शहर आणि तालुक्यातील लोकांसाठी डी सी पी पास देतील असेही कळवले आहे.

याबाबत बेळगाव शहर आणि तालुक्यातील लोकांनी आंतर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी उप पोलीस आयुक्त(डी सी पी)यांच्याकडे अर्ज करावेत असे कळवले आहे. त्या शिवाय जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत त्या गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे अथवा त्या तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे देखील अर्ज करावेत असे आवाहन केले आहेत.

पर राज्यात जणाऱ्यांनी इथं अर्ज करा

बेळगावातून पर राज्यात जाणाऱ्या विद्यार्थी कामगार आणि इतर प्रवाश्यानी कर्नाटक सरकार सेवा सिंधू योजना या
https://sevasindhu.karnataka.gov.in/Sevasindhu/English वेबसाईटवर वर संपर्क करून नाव नोंदणी करून माहिती द्यावी असे कळवण्यात आले आहे. आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांची विद्यार्थी प्रवाश्यांचे अर्ज स्वीकारून सरकारच्या मार्गसुची नुसार परवानगी देण्यात येणार आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Me and including my two brothers have been stucked here for somany days and my family was situated in Maharashtra so there food and living problem is there for us hope soon the permission will be given for us to travel at our home safely ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.