कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने पर राज्यातून येणाऱ्या आणि त्यातही हॉट स्पॉट राज्ये असलेल्या प्रदेशातून कर्नाटकात येणाऱ्या व्यक्तींसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली आणि तमिळनाडू ही राज्ये कोरोनाची हॉट स्पॉट राज्ये म्हणून ओळखली जातात या राज्यातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या व्यक्तींना 14 दिवसाचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करून घ्यावे लागणार आहे.
9 मे रोजी एक जोडपे या हॉट स्पॉट राज्यातून आले होते त्यांच्यावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता पण नूतन स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे या जोडप्याला आता 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन साठी शहरातील काही लोजिंग ताब्यात घेण्यात आली आहेत आणि या लोजिंगचे भाडे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन होणाऱ्या व्यक्तींनी भरायचे आहे.कोणते लॉज निवडायचे याची मुभा मात्र इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन होणाऱ्यांना देण्यात येणार आहे. या लॉजना आरोग्य खात्याचे कर्मचारी पहाणी करणार आहेत तसेच होम
क्वारंटाइन झालेल्यांच्या घरीही पोलीस आणि आरोग्य खात्याचे वेळोवेळी भेटीची पहाणी करणार आहेत.
हा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याचा निर्णय पर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.