कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमम्मई हे आज निपाणी जवळील कोगनोळी चेकपोस्टला भेट देणार आहेत.कोगनोळी चेक पोस्टची चर्चा सध्या राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे.येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचे परराज्यातून येणारे तसेच अन्य राज्याचे अधिकारी कौतुक करत आहेत.
दोनशेहून अधिक विविध खात्याचे कर्मचारी दिवसरात्र सेवा बजावत आहेत.पोलीस,महसूल आणि आरोग्य खात्याच्या उत्कृष्ट समन्वयामुळे तेथून जाणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही तऱ्हेचा त्रास होत नाही.येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था,वास्तव्य आणि भोजनाची सोय देखील येथे करण्यात आली आहे.
चोरट्या मार्गाने कर्नाटकात प्रवेश करण्याचे प्रकार रोखण्याचे कार्य देखील येथील कर्मचारी करतात.कोगनोळी चेक पोस्टला भेट देऊन गृहमंत्री तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेणार आहेत.
काय आहे या निपाणी चेक पोस्ट ची खासियत