कर्नाटक सरकारने राज्यात हेल्थ रजिस्टर ही योजना राबविण्याचे निश्चित केले आहे.या योजने अंतर्गत राज्यातील घरोघरी जावून माहिती गोळा केली जाणार आहे.अठरा विभागाच्या खासगी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या बरोबर चर्चा करून वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ सुधाकर यांनी ही घोषणा केली.
हेल्थ रजिस्टर ही कल्पना जगातील काही देशात राबवण्यात आली आहे.कर्नाटक हे भारतातील हेल्थ राजिस्टरची योजना राबविणारे पाहिले राज्य ठरणार आहे.आशा कार्यकर्त्या आणि खासगी संस्था यांच्या मदतीने हेल्थ रजिस्टरसाठी माहिती गोळा करण्याचे काम केले जाणार आहे.
प्रारंभी चिक्कबळापूर जिल्ह्याची हेल्थ रजिस्टर योजना राबविण्यासाठी निवड करण्यात आली आहे.प्रत्येक घरात जावून आरोग्य खात्याचे सहाय्यक,आशा कार्यकर्त्या माहिती गोळा करणार आहेत.यासाठी प्रश्नवली तयार करण्यात येणार असून त्या आधारे माहिती गोळा केली जाणार आहे.एका जिल्ह्यासाठी माहिती गोळा करण्यास किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे.