सलून आणि पार्लरसाठी मार्गदर्शक नियम-
ताप, सर्दी,खोकला आणि घसादुखी असलेल्या व्यक्तींना सलूनमधे प्रवेश देऊ नये.
मास्क शिवाय ग्राहक आणि कामगार याना सलून मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
प्रवेशद्वारात हॅन्ड सॅनिटायझर ठेवावे.
केस कापणाऱ्या व्यक्तीने मास्क,डोके झाकून घेणे आणि एप्रन घालणे आवश्यक आहे.
प्रत्येक ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल किंवा पेपरचा वापर करावा.ग्राहकाला साहित्य वापरल्यावर पुन्हा ते साहित्य निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.यासाठी सात टक्के लायसोल वापरावे.एकाहून अधिक सेट साहित्य ठेवावे म्हणजे वेळ वाचतो.ग्राहकाचे केस कापल्यावर प्रत्येकवेळी हात निर्जंतुकीकरण करून घ्यावेत.गर्दी टाळण्यासाठी वेळ ठरवून किंवा कुपन देऊन ग्राहकांना बोलवावे.

बसण्याच्या ठिकाणी एक मीटर अंतर ठेवावे.जमीन,जिना,लिफ्ट,दरवाजाचे हँडल दिवसात दोनवेळा सोडियम हैपोक्लोरेट वापरून धुवावे.कार्पेट आणि जमिनीची वारंवार स्वच्छता करावी.ब्लेड सारख्या टोकदार वस्तू वापरून झाल्यावर पांढऱ्या डब्यात गोळा कराव्या.
त्यात एक टक्का सोडियम हैपोक्लोरेट सोल्युशन घालावे.हा डबा 75 टक्के भरल्यावर बायो मेडिकल वेस्ट एजन्सी कडे द्यावे.खोकणे,सोशल डिस्टनसिंग साठी माहिती देणारी पत्रके लावावीत.सगळे कर्मचारी आणि हेल्पर यांना मास्क वापरणे,खोकणे याची माहिती द्यावी.कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास आप्तमित्र हेल्पलाईन 14410 वर संपर्क साधावा.

