दुपारी प्रसिद्ध झालेल्या आरोग्य खात्याच्या बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे या चार व्यक्ती पैकी पी 2384 हा 32 वर्षाचा हंदीगनूर येथील पुरुष आहे .पी 2383 ही दोन वर्षांची मुलगी केरळ हुन आली असून तिच्या पालकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजले आहे.
या मुलीचे कुटुंबीय भाग्य नगर मध्ये राहिले होते अशी माहिती आहे पण याबाबत संबंधित अधिकाऱ्याने अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे या मुलीचे आजोळ वडगांव मध्ये असून तेथेही या मुलीचे कुटुंबीय नेहमी ये जा करत असत याबाबत देखील जिल्हा प्रशासनाने अधिकृत माहिती देणे गरजेचे आहे-पी 2385 हा रुग्ण 28 वर्षाचा युवक असून तो बेळगाव मधील कुमार स्वामी रहिवाशी ले आऊट असल्याचे समजते.
पी-2386 हा 37 वर्षाचा रुग्ण असून त्याला सदाशिवनगर मधील हॉस्टेल मध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते पण याच्या निवास स्थानाबद्दल माहिती मिळाली नाही.बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्री बाबत देखील स्पष्ट माहिती नाही त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्यानेच याबाबतची अधिकृत माहीती देणे आवश्यक आहे.
बेळगाव शहरात सध्या केवळ सदाशिवनगर हा भाग कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तो एकच भाग अजूनही निर्बंधित क्षेत्र आहे आता आजच्या नवीन रुग्णांच्या मुळे चार नवीन कंटेंनमेट झोन शहरात होतील का? अशी भीती जनतेत निर्माण झाली आहे.
बेळगाव शहरात आणखी चार कंटेनमेंट झोन झाल्यास त्याचा त्रास जनतेला होणार आहे व्यापारी, आस्थापने, शाळा,महा विद्यालये,व्यापारी संकुले असलेल्या भागांत नवीन कंटेनमेंट झोन आले तर त्याचा परिणाम व्यापार आणि शैक्षणिक क्षेत्रावर देखील होण्याची शक्यता आहे.