जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस आणि होमगार्ड यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने हेल्प फॉर निडी या संस्थेतर्फे वॉटर प्युरीफायर देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
ट्रॅफिक पोलीस स्थानकात एसीपी चंद्रप्पा,एसीपी कल्याणशेट्टी,सीपीआय श्रीनिवास हंडा, सीपीआय संतोष कुमार,महिला पीएस आय एल.एच.नलवडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.पोलीस स्टेशनला देण्यात येणारे वॉटर प्युरीफायर सागर स्वामी आणि क्लेरा स्वामी यांनी पुरस्कृत केले आहेत.
जनतेच्या रक्षणासाठी पोलीस आणि होमगार्ड आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत.त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने वॉटर प्युरीफायर देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.पोलिसांच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.
आपला जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस खात्याला धन्यवाद द्यायला पाहिजे असे उदगार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी काढले.यावेळी प्रीती बसवराज,केथ स्वामी,निशा सायगवी,बसनगौडा पाटील,रोहित किल्लेकर,योगेश कलघटगी आणि मिशेल स्वामी उपस्थित होते.