झारखंड येथे भर ऊंनात पायी चालत निघालेल्या एक स्थलांतरित कामगाराचा आज मृत्यू झाला आहे.चालून चालून थकला आणि जीव गेला अशा अवस्थेतील या कामगाराची व्यथा डोळे पाणावणारी आहे.
बाबूलाल सिंग वय 46 असे त्या मयत कामगाराचे नाव.आपल्या गावी परतण्यास कुठलीच वाहतूक व्यवस्था नसल्याने पायी चालत निघालेल्या बारा जणांच्या टीम मधील तो एक सदस्य होता. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे रस्ता तयार करण्यास ही टीम आली होती. आपल्या गावी जाण्यासाठी वाहनाची सोय होईल यासाठी त्यांनी वाट पाहिली पण सोय झाली नसल्याने ते चालत निघाले होते.
चिकोडी पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी 80 हजार रुपये गोळा केले व मृतदेह अंबुलन्स मधून झारखंड ला पाठवले सोबत तिघे कामगार पण गेले आहेत.५ मे पासून त्यांनी खानापूर येथून प्रवासाला सुरुवात केली होती. चिकोडी चेकपोस्ट जवळ ते सापडले. त्यांना कोविड तपासणीसाठी चिकोडी शासकीय इस्पितळात नेण्यात आले होते.
तेथे बाबूलाल दगावला, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली.चिकोडी येथील कामगारांचा व्हीडिओ पहा खालील लिंक वर
खानापूरहुन झारखंडला जाणाऱ्या कामगाराचा झाला वाटेतच झाला मृत्यू-चिकोडी झाला मृत्यू-पहा खालील व्हीडिओ
Posted by Belgaum Live on Thursday, May 7, 2020