तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक ही अत्यंत गरजेचे आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ही निवडणूक दिनांक 25 एप्रिल रोजी होणार होती. मात्र ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मराठीबहुल भाषिक या सोसायटीच्या सभासदांमध्ये अधिक आहेत.
आता या सोसायटीच्या निवडणुकीकडे मराठी नेत्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून झालेल्या पी एल डी बँक निवडणुकीत मराठी नेत्यांनी पीछेहाट केली होती. आता तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे मराठी नेत्यांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
या वेळी पी एल डी बँकेच्या निवडणुकीत कणखर भूमिका न घेतलेल्या नेत्यांनी आता मात्र तालुका मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीकडे झोकून काम केले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. तालुका मार्केटिंग सोसायटीसाठी 15 सभासद असतात. यामध्ये अनुसूचित जाती साठी एक अनुसूचित जमातीसाठी एक ओबीसीसाठी दोन महिलांसाठी दोन आणि सर्वसामान्यांसाठी नऊ जागा राखीव ठेवण्यात येतात.
लॉक डाऊन परिस्थितीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असली तरी लवकरच ही निवडणूक होणार आहे. आर्थिक उलाढाल होण्याच्या दृष्टिकोनातून तालुका मार्केटिंग सोसायटीकडे पाहिले जाते.
बेळगाव तालुक्यात सुमारे 70 ते 80 सोसायट्या तालुका मार्केटिंग सोसायटीच्या अखत्यारीत येतात. या सोसायट्यांमध्ये मराठी बहुभाषिक अधिक आहेत. मात्र काही राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागून मराठी अस्मिता धोक्यात आणण्याचे काम ही काहींकडून होत आहे. त्यामुळे यावेळी तालुका मार्केटिंग सोसायटीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा फडकवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.