ज्या गावात स्वच्छता, स्वच्छ हवामान आणि योग्य गावाचे नियोजन असते हे गाव कधीही विकासाला गतिमान असते. मात्र अनेक वेळा भलत्याच्या चुकांचा फटका गावांना बसत आला आहे. मात्र याचे सोयरसुतक आणि त्याच वेळी बंदोबस्त केल्यास ते सोयीचे ठरणार असते. अशीच घटना तालुक्यातील निलजी ग्रामपंचायतमध्ये घडली आहे. मात्र याकडे निलजी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे गाव तसं चांगलं आणि दुसऱ्यांच्या ड्रेनेज पाण्यामुळे नासलं अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. मुतगा हद्दीतील काही घरांचे सांडपाणी निलजी गावच्या तलावात येते. या गावातील मुख्य तलाव आहे. या तलावात निलजी गावातील नागरिक जनावरे तसेच इतर कामे करत असतात. मात्र मागील काही दिवसापासून मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील काही घरांचे पाणी या तलावात जात असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गाव तसं चांगलं पण दुसऱ्यांच्या ड्रेनेज पाण्यामुळे नासलं अशीच प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत आता गांभीर्याने विचार करून मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील येणारे सांडपाणी रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात असणारे हे गाव विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा घडणारे ठरत आहे. सध्या या गावातील एका तलावात मुतगा गावातील काही घरांचे ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याने हे तलाव खराब होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून संबंधितांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज ही निर्माण होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे ड्रेनेज पाणी जनावरांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे आणि शेतीलाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे याकडे संबंधित ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.