चंदन वाहिनीवर दहावीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना देखील उजळणी वर्ग घेऊन मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी विधान परिषद सदस्य अरुण शहापूर यांनी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांना पत्र लिहून केली आहे.
कर्नाटकातील दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
चंदन वाहिनीवर उजळणी वर्ग घेण्यात येणार आहेत.याचा लाभ इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.माझ्या मतदार संघात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.त्यांनी चंदन वाहिनीवरून मराठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे.
त्यामुळे चंदन वाहिनीवरून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उजळणी वर्ग घेऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी आमदार अरुण शहापूर यांनी केली आहे.मराठी शाळांना आर्थिक मदतही द्यावी असेही शहापूर यांनी पत्रात लिहिले आहे.
बेळगाव शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ही मागणी आमदार शहापूर यांच्याकडे करण्यात आली होती शहापुर यांनी मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.बेळगाव जिल्ह्यात मराठी विद्यार्थ्यांची अधिक आहे ऑनलाइन उजळणीचा लाभ कन्नड व इंग्लिश माध्यमांना होत आहे मराठी विद्यार्थ्यांकडे शिक्षण मंत्री लक्ष देतील का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.