हे शैक्षणिक वर्ष फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात अडचणीचे ठरणार नाही तर कोविड साथीने आगामी सत्रात शालेय शिक्षणातिल अनेक आनंदही हिरावून घेतले जाणार आहेत.कर्नाटक सरकारने आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्व प्रकारचे शालेय दौरे आणि सहली रद्द केल्या आहेत.
उघडपणे शालेय मुलांच्या सुरक्षेची दखल घेऊन शिक्षण विभागाने ‘पुढील सूचना येईपर्यंत’ हा आदेश जारी केला आहे.दरवर्षी शाळेतील सहल हा विषय विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा असतो. पण यंदा कोरोनाने भयपद स्थिती निर्माण झाली आहे.
कोणत्याही मंदिर, देवालय आणि पर्यटन स्थळावर जाण्याची सोय नाही. लहान मुलांना अशा ठिकाणी पाठवणे धोक्याचे ठरू शकते. याचा विचार करून शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे.