लॉक डाऊन काळात कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत सत्कार झाला.
पाईप लाईन रोड ,विजय नगर भागातील नागरिकांनी कोरोना योध्याचे पुष्पवर्षाव करून आभार व्यक्त केले यावेळी झालेल्या पथ संचालनात पोलीस, वैद्यकीय कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
पथ संचलनात नागरिकांनी पुष्पवर्षाव केला आणि टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. भागातील शेकडो नागरिक आपापल्या दारात थांबून सामाजिक अंतर ठेवत आणि मास्क चा वापर करत अत्यावश्यक सेवा पूर्वणाऱ्याना आभार मानले.यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरुन पोलिसांनी पथसंचलन केले . यावेळी रस्त्यावर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या . यावेळी लहान मुलांसहित मोठ्या माणसांनी कोरोना वॉरियर्सचा जयजयकार केला . त्याचवेळी एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या पायाशी वाकून नमस्कार केला देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो शक्ती देवो अशी प्रार्थना केली.
खडेबाजार ए सी पी चंद्रप्पा,कॅम्प पोलीस निरीक्षक संतोष कुमार यांच्या सह स्थानकातील पोलीस वर्ग , डॉक्टर, हिंडलगा भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार लोकांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या सह पाईप लाईन रोड वरील विघ्नहर्ता युवक मंडळ, शंभूराजे युवकमंडळ , जिजामाता युवकमंडळ , हनुमान मंदिर ट्रस्ट, साई मंदिर ट्रस्ट यांचे आदींनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
राज्यातील नागरिकांकडून पोलिसांचा आणि कोरोना योध्यांचा सन्मान होणे हि पहिलीच घटना मानली जात आहे.