येळ्ळूर गावावरील निर्बंध हटविल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वतः हून काळजी घेण्याची वर्ज आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्बंध हटविण्यात आल्याचे पत्रक दिले आहे.
येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित महिला आढळल्यानंतर संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यातआले होते. चार दिवसांपूर्वी बहुसंख्य निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर निर्बंध हटविल्याचे पत्रक काढले आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने व व्यवसाय सुरु झाले आहेत. असे असले तरी जनतेनेच आता स्वत : हून काळजी घेणे गरजेचे आहे.
येळ्ळूर गावातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्या महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर ती महिला पूर्ण बरी झाली. तिला घरी पाठविण्यात आले. याचबरोबर क्वारंटाईनमध्ये असलेल्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनाही घरी पाठविण्यात आले होते. तरी देखील निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. आता रितसर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध हटविण्याची सूचना ग्राम पंचायतीला केली आहे.
बंद केलेले अनेक रस्ते खुले व रस्त्यावर टाकलेले मातीचे ढिगारे काढण्यात आलेले आहेत.येळ्ळूर गाव कंटेनमेंट मुक्त झाले असून हेअर कटिंग सलून ब्युटी पार्लर हॉटेलची दुकाने बंद ठेवा तसेच मटण चिकण विक्री दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 व इतर सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 7 सुरू करा असे आवाहन येळ्ळूर ग्राम पंचायतीने केल आहे.