वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याची घटना पंत बाळेकुंद्री भागात घडली आहे.तलवारीने केक कापत असलेला व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पोलिसांनी याबद्दल गुन्हा नोंद करून घेतला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
प्रेम कोलकार असे तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाचे नाव असून तो महिला आमदारांचा समर्थक आहे.सोशल मीडियावर या घटनेबद्दल नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.केकवर फ्युचर एम एल ए प्रेम असे लिहिलेले होते.या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
सदर युवक आमदार समर्थक असल्याने पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ का करत आहेत असा सवाल केला जात आहे.