Monday, December 23, 2024

/

नानावाडीतील दाम्पत्यावर काळाचा घाला

 belgaum

पुण्याहून कोल्हापूरला मुलांना आणण्यासाठी जाणारे नानावाडी बेळगाव येथील दांपत्य कारवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघात जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना महाराष्ट्रातील उंब्रजनजीकच्या भोसलेवाडी (ता. कराड) येथे शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली.

अपघातातील मृत डॉ. अनुजा अमित गावडे (वय 35) आणि अमित अप्पाजी गावडे (वय 38) हे नानावडी बेळगाव येथील रहिवासी आहेत. गावडे दाम्पत्य पुण्याहून आपल्या मुलाला आणण्यासाठी वॅगनार कारमधून कोल्हापूरला निघाले होते. त्यावेळी उंब्रजनजीक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारगाडी डिव्हायडरला धडकली. यामध्ये गावडे पती – पत्नी जागीच ठार झाले. अपघाताचे दृश्य इतके हृदयद्रावक होते की पंचक्रोशीत याबाबत हळहळ व्यक्त होताना दिसत होती.

कार डिव्हायडरला
धडकल्यामुळे कारचालक गाडीतच अडकून पडला होता. त्याला कटरच्या साह्याने कार मधून बाहेर काढण्यात आले. सदर अपघातात वॅगनार कारचा जवळपास चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याबरोबरच मदत कार्य हाती घेतले.

अपघातातील मयत अमित गावडे हे नानावाडी येथील प्रतिष्ठित नागरिक आप्पाजी (बाबी ) गावडे यांचा द्वितीय सुपुत्र व अशोक गावडे यांचे पुतण्ये होते. गावडे कुटुंबावर कोसळलेल्या या आपत्तीमुळे नानावाडीत सध्या शोकाकुल वातावरण आहे. सदाशिवनगर मुक्तिधाम येथे गावडे दाम्पत्यावर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले त्यांच्या मयतांच्या पश्चात 5 वर्षांचा मुलगा, आई, वडील, भाऊ, वहिनी, काका, काकी आदी मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.