कोरोनानंतरचे जग एक वेगळेच जग असणार आहे. या जगात माणूस पुन्हा माणुसकीच्या नात्याने जोडला जावा, परस्पर संवादाला महत्त्व असणाऱ्या या नव्या जगाचे भारताने नेतृत्व करावे, असा आशावाद निर्माण करणारा “नया इंडिया” हा अल्बम बेळगावचा युवक प्रथमेश परेश शिंदे यांने दिग्दर्शित केला आहे. या अल्बममधील नया इंडिया हे गीत बेळगावच्या तरुणाईने गायले आहे, तर यामध्ये अनेक बॉलीवूडसह मराठी व कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आपला सहभाग दर्शविला आहे. हा अल्बम उद्या शनिवारी प्रदर्शित होत आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करुन एक नवीन उत्तम सशक्त राष्ट्राची निर्मिती करण्याच्या उद्देशाने “नया इंडिया” या म्युझिक अल्बमची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या आपण अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत असलो तरी आपल्या मनात आत कुठेतरी आपल्याला माहित आहे की आपण या परिस्थितीवर मात करू शकतो.
हे संकट ही निघून जाईल. भारत उज्वल भविष्य आणि नव्या प्रयत्नासाठी सज्ज आहे. जरी सध्या आपल्याला घराबाहेर पडण्यास परवानगी नसली तरी अप्रत्यक्षरीत्या आपण संघटित होऊन आनंद आनंदी जीवन जगू शकतो. हाच धागा पकडून बलशाही राष्ट्रनिर्मितीसाठी “नया इंडिया” या अल्बमची निर्मिती करण्यात आली आहे. लॉक डाऊनमुळे एकमेकांना भेटणे बंद झाले आहे. तथापि स्नेह भावनेने माणूस एकमेकांशी जोडला गेला आहे. माणुसकीचे बंद आजही घट्ट असून त्यातून नव्या भारताचा उदय होणार आहे, असा आशावाद या अल्बममधील गीतातून व्यक्त करण्यात आला आहे. हा अल्बम शनिवारी प्रदर्शित होणार असून याला बेळगांवकर उस्फूर्त प्रतिसाद देतील असा आशावाद आहे.
सदर गीताचे गायन समीक्षा जोशी व मयुर रामावत त्यांनी केले असून गीतरचना करण बिर्जे याने केली आहे. संगीत संयोजन मयुर रामावत व अनिकेत हेरंजाल यांचे आहे. संगीत निर्मिती मयूर रामावत आणि संकलन अनिकेत हेरंजाल आणि निकिता मत्तिकोप यांची आहे. ओमकार राऊत, प्रथमेश अवसरे आणि प्रथमेश शिंदे यांनी कॅमेऱ्याची तर निकिता मत्तिकोप व प्रणय पाटील यांनी ग्राफिकची तसेच श्रीवास्तव जम्मीहाळ याने संपादनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार बेळगावचे आहेत.
हे आहे त्या गाण्याचे लिंक